अनेक दशकांचे वैर 21 तासात मिटवणे अशक्य; अमेरिका-इराण शस्त्रसंधी टिकणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा अयशस्वी झाली आहे. सद्यस्थितीत दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या अटींबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच आता ही शांतता चर्चा अपयशी ठरल्याने अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे. आता त्याचे युद्धात रुपांतर झाले आहे. त्यामुळे, अनेक दशकांचे वैक 21 तासात मिटवता येत नाही, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जर इराणने युरेनियम संवर्धनावर काही लवचिकता दाखवली, तर हा प्रश्न सुटू शकतो, असे मतही जगभरातून व्यक्त होत आहे.

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील सुमारे 21 तास चाललेली शांतता चर्चा अयशस्वी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, दशकांहून जुने युद्ध काही तासांत मिटवणे अशक्य आहे. या चर्चेत युरेनियम संवर्धन हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला. काही तज्ज्ञांच्या मते, जर इराण ५ टक्के संवर्धनासाठी तयार झाला, तर हा प्रश्न सुटू शकतो.

इराणने युरेनियमच्या मुद्द्यावर लवचिकता दाखवणार का आणि अमेरिकेने नुकसान भरपाई दिली, तर इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. इराणला हमी हवी आहे की अमेरिका पुन्हा हल्ला करणार नाही. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा अभाव आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता हे दोन देश नेमके काय निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आता या दोन देशांची भूमिका जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे.