
गाझाकडे जाणाऱ्या बचाव मोहिमेवरील बोटीवर केलेल्या हल्ल्या प्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याविरोधात तुर्किमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 1,102 ते 4,596 वर्षांपर्यंत शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
सप्टेंबर 2025मध्ये इस्रायली नौदलाने सुमूद फ्लोटिला मोहिमेला रोखले होते. ही एक मदत आणि बचाव मोहीम होती. या जहाजांमध्ये खाण्यापिण्याचे सामान, औषधे आणि इतर आवश्यक मदत पाठवली जात होती. इस्रायलच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमेमध्ये बेकायदा अडवून हल्ला केल्याचा आरोप तुर्कियेने केला आहे. यासंदर्भात इस्तंबूलच्या मुख्य सरकारी वकिलांच्या कार्यालयाने नेतान्याहू यांच्यासह 35 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपांमध्ये मानवतेविरुद्धचे गुन्हे, नरसंहार, बेकायदेशीर कोठडी, छळ आणि लुटमार यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

























































