अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार, 15 एप्रिलपासून करता येईल नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू भाविकांसाठी अतिशय महत्त्वाच्या अमरनाथ यात्रेचा या वर्षीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्प येथून भाविकांचा पहिला जत्था रवाना होईल.

जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यासंदर्भात माहिती दिली. 57 दिवसांच्या यात्रेसाठी 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. अमरनाथ गुहेमध्ये पहिली पूजा 19 जून रोजी ज्येष्ठ पोर्णिमेच्या मुहूर्तावर होईल. यात्रेसाठी अनंतनाग येथून 48 किलोमीटर अंतराचा नुनवान-पहलगाम हा पारंपरिक आणि गंदेरबल येथून 14 किलोमीटरचा बालटालचा मार्ग खुला राहील. 13 ते 70 वर्षे वयाच्या भाविकांना ही यात्रा करता येईल.

556 बँक शाखांमध्ये करता येईल नोंदणी

देशभरातील विविध बँकांच्या 556 शाखांमध्ये यात्रेसाठी नोंदणी करता येणार आहे. याशिवाय श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरूनदेखील ऑनलाईन नोंदणी करता येईल. भाविकांच्या ट्रकिंग आणि सुरक्षेसाठी ‘आरएफआयडी’ कार्डची सुरुवात करण्यात आली आहे.