‘खुल जा सीम सीम’, भिंतीसारखा दरवाजा, तळघरात कोंबल्या 12 तरुणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

पोलिसांचा छापा पडल्यानंतर अल्पवयीन मुली आणि तरुणींना लपवण्यासाठी मीरा रोडमधील आर्चिड ऑर्केस्ट्रा बारच्या चालकाने फक्त तळघरच तयार केले नव्हते, या तळघराकडे जाणारा दरवाजा भिंतीसारखाच बनवण्यात आला होता. त्रिपीन सॉकेट लावल्यानंतर ‘खुल जा सीम सीम’ प्रमाणे ही भिंत बाजूला होत होती. हे तळघर तोडून पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलींसह 12 तरुणींची सुटका केली आहे.

मीरा रोड पूर्वेच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या ऑर्चिड बारमध्ये मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींकडून अश्लील कृत्य करून घेतले जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास पोलिसांनी या बारला वेढा घातला. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना एका भिंतीमागे गोपनीयरीत्या तयार केलेले कॅव्हिटी रूम सापडली. या तळघराचा दरवाजा हा भिंतीसारखा दिसत होता. तो दरवाजाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डाला त्रिपीन लावल्यानंतर उघडत होता. याच तळघरात अल्पवयीन मुली आणि तरुणींना लपवून ठेवण्यात आले होते. ही खोली अरुंद असून खोलीत हवा, पाणी आणि प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलिसांनी बारचे 2 मॅनेजर, 1 कॅशियर आणि 10 वेटर्स अशा एकूण 13 जणांना ताब्यात घेतले आहे. फरार मालक आणि चाल काविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.