
भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी चालकाला दणका दिला. इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण नसतानाही आरोपीने बेजबाबदारपणे बस चालवायला घेतली तसेच हा अपघात साधा नव्हता असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने आरोपी संतोष सावंतचा जामीन अर्ज फेटाळला. भांडुप रेल्वे स्थानक परिसरात बेस्टच्या ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस चालवणाऱया चालकाने पादचाऱयांच्या चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 जखमी झाले. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. जामिनासाठी आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर अतिरिक्त न्यायाधीश व्हाय. पी. मनथकर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली.

























































