राज्यसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचे कौतुक करत त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी केली. योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे सांगत हरिवंश यांच्या कार्यपद्धतीचे आणि पत्रकारितेतील योगदानाचेही विशेष उल्लेख केला.





























































