
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी घोषणा केली आहे की, शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ‘पूर्णपणे खुली’ राहील. ‘X’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, सर्व व्यापारी जहाजांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे.
अराघची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘लेबनॉनमधील शस्त्रसंधीला अनुसरून, होर्मुझ सामुद्रधुनीतून सर्व व्यापारी जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग, इराणच्या ‘पोर्ट्स अँड मॅरिटाइम ऑर्गनायझेशन’ने आधीच जाहीर केलेल्या समन्वयित मार्गावरून, शस्त्रसंधीच्या उर्वरित कालावधीसाठी पूर्णपणे खुला घोषित करण्यात येत आहे’.
इराणने या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील नाकेबंदी शिथिल केल्यामुळे जागतिक व्यापाराला, विशेषतः तेल पुरवठ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही घोषणा प्रादेशिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
In line with the ceasefire in Lebanon, the passage for all commercial vessels through Strait of Hormuz is declared completely open for the remaining period of ceasefire, on the coordinated route as already announced by Ports and Maritime Organisation of the Islamic Rep. of Iran.
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 17, 2026



























































