भाजपचे महिलांवरील प्रेम हे बेगडी, काँग्रेसची भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधकांनी संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिले नाही, असा चुकीचा प्रसार करणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज काँग्रेसने खरपूस समाचार घेतला. भाजपने आतापर्यंत किती महिलांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष बनवले आहे, हे त्यांनी सांगावे. मोदी यांनी सर्वात आधी महिला असलेल्या जशोदा बेन यांचा सन्मान करावा, अशा शब्दांत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मोदी यांच्यावर टीका केली. ज्या महिलेला विवाह करून घरी आणले आहे त्या जशोदा बेनला सन्मान मिळाला नाही. तर भाजप देशातील महिलांचा काय सन्मान करणार आहे, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला.