अटल सेतू ते पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरच्या कामाला वेग; फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग या जोडणी प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून हा प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. 176 ठिकाणांपैकी 143 ठिकाणी काम पूर्ण झाले असून 141 ठिकाणी पियर्स उभारले आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईहून पुणे द्रुतगती महामार्गावर 30 मिनिटांत पोहोचता येणार आहे.

मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या मार्गावर 88 ठिकाणी पियर पॅप्सची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 830 पैकी 653 प्रीकास्ट गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही सुरू आहे. 7.35 किमी लांबीचा आणि सहा मार्गिकांचा हा उच्च क्षमतेचा पूल अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यादरम्यानचा महत्त्वाचा दुवा म्हणून उभा राहत आहे. चिर्ले आणि पळस्पेमार्गे थेट उच्च-गती जोडणी उपलब्ध होणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गातून सुलभ प्रवेश मिळणार आहे.