
लोकलच्या डय़ुटीवर असलेल्या ट्रेन मॅनेजरला होमगार्डने लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विलेपार्ले स्थानकावर मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. महिलांच्या डब्यातील गेटवर चार होमगार्ड उभे होते. त्यांचा महिला प्रवाशांच्या येण्या-जाण्यात अडथळा येत होता. त्यावेळी ट्रेन मॅनेजरने चौघांना एकाच गेटवर उभे न राहण्याची विनंती केली. त्यावरून वाद घालत एका होमगार्डने चक्क ट्रेन मॅनेजरला लाथ मारली. संबंधित होमगार्डवर कारवाई करण्यासाठी कर्मचारी संघटनांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.






























































