
सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एकीकडे भीती आणि दुसरीकडे आईची माया, अशा दोन छटा दिसतात. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका घरात माकड शिरले आणि एका खोलीत असलेल्या तीन महिन्यांच्या ताह्या बाळावर माया दाखवू लागले. अचानक खोलीत आलेली बाळाची आई हा प्रकार पाहुन घाबरली. माकड कोणालाही बाळाच्या जवळ येऊ देत नव्हते. अखेर एका वन्यजीव तज्ञाला बोलावले. त्याने माकडाचे लक्ष दुसरीकडे वळवून बाळाला क्षणात आपल्याकडे ओढले. हे एक मादा माकड होते. तिच्या पिल्लाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे या तान्हुल्यालाच तिने आपले पिल्लू समजले. त्यामुळेच माकड बाळाजवळ गेले होते.


























































