Photo – मेंदी रंगली गं…! गायत्री दातारचा मेंदी सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच गायत्रीचा मेंदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेंदीचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या कार्यक्रमात गायत्री आणि आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मेंदीच्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले आहे. या दोघांच्या जोडीचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.