
>> विनायक
आखाती भागात चाललेल्या युद्धातला अग्निप्रलय व्यापक होत चाललेल्या काळात तिकडे इन्डोनेशिया आणि आसपासच्या देशात झालेला जवळपास साडेसात रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर उसळलेला समुद्र या बातम्या झाकोळल्या गेल्या. हल्लीची चॅनली वृत्तांकनाची पद्धत म्हणजे एकच एक बातमी घेऊन चघळत आठवडाभर रवंथ करायची. मधल्या काळात कितीतरी महत्त्वाची वृत्त निसटून जातात त्याचा पत्ता नसतो. त्यात आणि टीआरपीचं गणित. गेल्या काही वर्षांत हे नेहमीचंच झालंय. अर्थात काही जागरूक चॅनलनी आणि वृत्तपत्रांनी इन्डोनेशियन भूकंपाच्या परिणामांची दखल घेतली हेसुद्धा खरंच.
गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जगभरच्या महाभूकंपांचं आणि सागरतळच्या भूकंपामुळे उफाळलेल्या सुनामींच प्रमाण वाढलंय. हा शब्द म्हणजे वारंवार भूकंप सहन करावा लागणाऱ्या जपानची जगाला मिळालेली शाब्दिक देणगी. यातलं त्सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाट. जहाजं ठेवलेल्या बंदरांकडे येणाऱ्या उसळत्या लाटा म्हणजे सुनामी, तर पूर्वेकडील देशात महत्त्वाचं स्थान असलेल्या इन्डोनेशियाच्या उत्तरेकडच्या भागात उत्तर मालुपू प्रदेशात 2 एप्रिलला 7.4 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने हादरा दिला.
इन्डोनेशियाच्या हवामान आणि भूगर्भ वैज्ञानिकांनी त्याचं मापन नोंदलं. मोठय़ा भूकंपानंतर 921 छोटे धक्केही जाणवले. त्यानंतर उत्तर मानाहासा भागात सुनामी लाटा उसळल्या. या वेळची सुनामी अगदी जपानमध्ये फुकुशिमाला उद्भवलेल्या भूकंपानंतर शहराकडे येणाऱ्या अक्राळ-विक्राळ लाटांसाठी नव्हती तरी भूकंप-सुनामीच्या एकत्रित परिणामाने काही घरं आणि पूल जमीनदोस्त झालेच.
पावसाचं बदलतं स्वरूप (पॅटर्न) सुनामींमुळे भूभागात शिरणारं पाणी आणि त्यातच अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण धुवावरचे तुटणारे महाहिमनग! पृथ्वीवर केव्हातरी प्रलय यायला आणखी निसर्ग प्रकोप कोणता पाहिजे! त्यातल्याच सागरपातळी वाढवून अनेक किनारपट्टय़ा गिळपृत करू शकले एवढी सागरपातळी उंचावून शकणाऱ्या ‘थ्वेट’ नावाच्या महाहिमनगाविषयी. 1940 मध्ये मानवी वस्तीला ‘थ्रेट’ (धोका) निर्माण करू शकणाऱ्या ‘थ्वेट’ हिमनगाचा शोध लागला. 1947 मध्ये त्या भागाचे सुमारे 65 हजार अवकाशी पह्टो (एरियल पह्टोग्राफीद्वारे) घेऊन या हिमनगाच्या संभाव्य धोक्याची घंटा वाजवली गेली. हे मापन 1959 ते 1966 पर्यंत पूर्ण झाल्यावर अमेरिकन भूशास्त्रज्ञ फ्रेड्रिक थ्वेट यांचं नाव या हिमनगाला मिळालं. 50 ते 100 किलोमीटर (विविध बाजूंचा) विस्तार असलेल्या या हिमनगाचा जाडपणा (थिकनेस) 800 ते 1200 मीटर एवढा प्रचंड आहे.
‘थ्वेट’चं क्षेत्रफळ 1,92,000 चौरस किलोमीटर असून फ्लोरिडा राज्याच्या क्षेत्रफळापेक्षा ते जास्त आहे. अंटार्क्टिकाचा ‘शोध’ लावणारे साहसी पर्यटक अॅमुंडसेन या नॉर्वेच्या दर्यावर्दीचा सन्मान म्हणून दक्षिण ध्रुवाजवळच्या समुद्राला अॅमुंडसेन-‘सी’ असं म्हणतात. 1872 ते 1928 इतपंच केवळ 55 वर्षांचं आयुष्य लाभलेले अॅमुंडसेन पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण धुवांना स्पर्श करणारे पहिले साहसी पर्यटक संशोधक.
या थ्वेट हिमनगाचा संभाव्य प्रताप आतापासूनच दिसू लागलाय. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचं पाणी गरम होऊ लागलं की, त्याचा परिणाम हिमनगांच्या तळाच्या भागात दिसू लागतो. अंटार्क्टिकावरचे थ्वेट आणि पाईन हे दोन मोठे ग्लेशिअर त्या हिमखंडाशी फारकत घेण्याच्या तयारीत दिसतात. आकाशी पह्टोग्राफीने या हिमनगांची आणि त्यांच्या एकावर एक साठलेल्या थरांची (शेल्वज) बरीच माहिती मिळाली. गेल्या पाऊण शतकात त्यात तंत्रज्ञानाने कितीतरी भर पडली आहे. असं म्हणतात की, 2031 पर्यंत हे हिमनग अंटार्क्टिकापासून विलग झाले तर तरंगत उत्तरेकडे येऊ लागतील आणि न्यूझीलंडसारख्या छोटय़ा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विशाल देशाच्या किनारपट्टीला धोका निर्माण करतील. सरतेशेवटी समुद्राची जलपातळी पुठेही वाढली तरी पृथ्वीवर पसरणार आणि गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता अनेक देशांच्या किनारपट्टय़ा गिळत सुटणार. गेल्या अनेक वर्षांत अंटार्क्टिकावरचं बर्फ वितळण्याची प्रक्रिया जोर धरत आहे. विविध कारणांनी होणारी तापमानवाढही थांबण्याचं म्हणजे थांबवण्याचं लक्षण दिसत नाही. ट्रम्पसारख्या अमेरिकन अध्यक्षांचा त्यावर म्हणे विश्वासच नाही! हे अजबच. तरी बरं 1992 ते 2017 पर्यंत अब्जावधी टन बर्फ वितळल्याचं समोर आलंय, पण लक्षात कोणीच घेणार नाही. संकट दारापर्यंत येत नाही तोवर ‘बघू त्या वेळी’ ही जागतिक वृत्तीच बनत चाललीय.
हे हिमनगांचं तुटणं आणि सागरपातळी वाढवणं रोखायचं कसं? त्यावरचे सुचवले जाणारे उपाय यथायोग्य नाहीत शिवाय प्रचंड खर्चाचेसुद्धा आहेत. इंजिनीअरिंग पद्धतीने हिमनगांमध्ये ‘रिइनपर्ह्स’ पद्धतीने म्हणजे काँक्रीटच्या खांबात सळय़ा घालून मजबूती आणतात तसं काही करता येईल का पिंवा दरड कोसळू नये म्हणून त्यावर लवचिक पण मजबूत धातूची जाळी घट्ट बांधतात तसं काही करता येईल का? असे हे पर्याय. परंतु ते काम अत्यंत किचकट ठरेल. आताच निर्णय घेतला तर हे उपाय प्रत्यक्षात यायला किमान 10 वर्षे लागतील आणि इतपं करून त्याचा आवश्यक तो परिणाम 30 टक्केच जाणवेल असंही म्हटलं जातं. मग दरम्यानच्या काळात हिमखंड विलग झाले, दरवर्षी सुमारे 16 अब्ज टन बर्फ वितळला तर त्याचं आकारमान 17 घनकिलोमीटर एवढं असेल. ही प्रलयकाराच्या परिणामाची पूर्वसूचना आहे.























































