मुख्यमंत्र्यांविरोधात सोलापुरात आंदोलन; ‘चले जाव’ची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आले असता, युवक काँग्रेसने आंदोलन करत ‘चले जाव… चले जाव’च्या घोषणा दिल्या. यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्र्ााr यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले असता, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांविरोधात ‘चले जाव… चले जाव’च्या घोषणा देत आंदोलन केले.

छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱया धीरेंद्र शास्त्र्ााRवर कारवाई करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने करणाऱयांना भाजप सरकार पाठीशी घालत असून, त्यांच्यावर कडक कारवाई का होत नाही? असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, महेश लोंढे, शशिकांत शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह अनेक पक्षांच्या पदाधिकाऱयांच्या घरांवर पोलीस गेल्या दोन दिवसांपासून पाळत ठेवून होते. घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात होता,’ असा आरोप युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला आहे.