
क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी सर्व थकीत रक्कम आणि व्याज भरणे आवश्यक आहे. बंद करण्यापूर्वी तुमचे सर्व रिवॉर्ड पॉइंट्स किंवा पॅशबॅक वापरून घ्या.
बँकेच्या कस्टमर केअरला फोन करा किंवा नेट बँकिंग/मोबाईल अॅपद्वारे ‘पॅन्सल /क्लोज्ड कार्ड ’ हा पर्याय निवडा. बँकेला ईमेलद्वारे कार्ड बंद करण्याची विनंती पाठवा.
बँकेकडून कार्ड बंद झाल्याचे लेखी माहिती (ई-मेल किंवा पत्राद्वारे) नक्की घ्या. कार्ड बंद झाल्याची खात्री झाल्यावर, चिप आणि मॅग्नेटिक स्ट्रिप कापून कार्ड नष्ट करा.
क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती केल्यानंतर बँकांना ते फक्त सात दिवसांच्या आत बंद करावे लागते. सात दिवसांत कार्ड बंद न झाल्यास ग्राहकाला भरपाई द्यावी लागते.
तुम्ही एका वर्षापासून कार्ड वापरले नसेल, तर बँक तुम्हाला नोटीस देऊन 30 दिवसांत कार्ड बंद करू शकता. क्रेडिट कार्ड बंद केल्याचा परिणाम ‘सिबिल स्कोर’वर होऊ शकतो.



























































