NEET UG 2026 – शिफारसी दोन वर्षांपासून कागदावरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ची परीक्षा सुरक्षित, पारदर्शक, तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या प्रा. राधापृष्णन समितीने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी संगणकाधारित परीक्षेचा मार्ग सुचवला होता. मात्र परीक्षेसाठी केलेल्या वेगवेगळय़ा शिफारस दोन वर्षांपासून कागदावर राहिल्या आहेत.

या आहेत शिफारसी

कागद-पेन परीक्षांऐवजी टप्प्याटप्प्याने संगणकाधारित परीक्षा पद्धत स्वीकारणे.

पूर्णपणे संगणकाधारित परीक्षा तातडीने शक्य नसलेल्या ठिकाणी मिश्र पद्धतीचा वापर करणे.

टप्प्याटप्प्याने संगणकाधारित अॅडाप्टिव्ह टेस्टिंग (कॅट) पद्धतीचा अवलंब करणे.

जेईई-मेन आणि जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षेप्रमाणे दोन टप्प्यांची परीक्षा पद्धत स्वीकारणे.

पहिल्या टप्प्यातून प्राथमिक निवड, दुसऱ्या टप्प्यात सखोल गुणवत्ता मूल्यांकन करणे.

‘नीट’मध्ये उमेदवारांची संख्या मोठी असल्यास अनेक दिवसांत किंवा वेगवेगळय़ा सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन करणे.

प्रश्नपत्रिका डिजिटलदृष्ट्या सुरक्षित स्वरूपात परीक्षा केंद्रांवर पाठवून त्या ठिकाणी छपाई करून प्रश्नपत्रिकांचे मुद्रण, वाहतूक आणि साठवणुकीच्या टप्प्यांत पेपरफुटीचा धोका टाळणे.

गुणांच्या समानीकरणासाठी पारदर्शक प्रणाली.

‘एनटीए’मध्ये पंत्राटी कर्मचाऱयांऐवजी कायमस्वरूपी आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करणे.

खासगी परीक्षा केंद्रांवरील अवलंबित्व कमी करून सरकारी संस्थांमध्ये परीक्षांचे आयोजन करणे.

‘नीट’साठी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची संख्या मर्यादित करणे.