पेटीएमने आणले पॉकेट मनी फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेटीएमने अल्पवयीन मुलांसाठी ‘पेटीएम पॉकेट मनी’ हे फीचर आणले आहे. या फीचरमुळे अल्पवयीन मुलांना बँक खाते न उघडता सुरक्षित डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. कुटुंबातील सदस्य मुलांना सुरक्षित आणि नियंत्रित पेमेंट अ‍ॅक्सेस आणि एक निश्चित खर्च मर्यादा सेट करून देऊ शकतील. या नवीन फीचरमध्ये पालकांना मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवणे, मासिक मर्यादा निश्चित करणे आणि रिअल टाइम ट्रॅकिंग करण्याची पूर्ण सुविधा मिळणार आहे. पालक मुलांच्या प्रत्येक व्यवहारावर सतत लक्ष ठेवू शकतील.