
हिंदुस्थानात हायड्रोजन इंधनावर रेल्वे धावण्यास रेल्वे विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. याआधी उत्तर रेल्वेने या रेल्वेची चाचणी अनेक टप्प्यांत पूर्ण केलेली आहे. आता ही ट्रेन नियमितपणे रेल्वे रूळावर धावणार आहे, परंतु ही रेल्वे कोणत्या तारखेपासून धावणार हे अद्याप रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले नाही. ही ट्रेन एकूण 10 डब्यांची असून जिन्द ते सोनिपत या मार्गावर धावणार आहे.

























































