
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक सिनेमॅटिक फोटोने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोत कोणताही लोगो नाही, ब्रँडचे नाव नाही, लाँचची अधिकृत घोषणा नाही. तरीही या एका फोटोने खळबळ उडवली. ट्विटरपासून इन्स्टाग्रामपर्यंत आणि फेसबुकपासून यूटय़ूबपर्यंत सर्वत्र याच इमेजची चर्चा रंगली आहे. या व्हायरल फोटोमध्ये दिसणारा चंद्र, त्याभोवती तयार करण्यात आलेले रहस्यमय वातावरण आणि सिनेमॅटिक फ्रेमिंग दिसत आहे. ही नेमकी कसली इमेज आहे ते समजत नाही. अनेकांना ही इमेज एखाद्या मोठय़ा ब्रँडच्या आगामी मेगा कॅम्पेनचा भाग असल्याचा संशय आहे, तर काहीजण यामागे एखाद्या नव्या टेक प्रॉडक्ट, वेब सीरिज प्रमोशनचा अंदाज व्यक्त करत आहेत. नेटिझन्स फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत.



























































