
गेल्या तीन चार महिन्यांपासून अंगाची लाही लाही करणाऱ्या गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मंगळवारी सकाळी मुंबई उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई उपनगरातील अनेक भागात सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सकाळी सात ते आठ दरम्यान ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळी पाऊस पडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.
View this post on Instagram
मुंबईतील अंधेरी, बोरिवली, विलेपार्ल, चेंबूर, सांताक्रूझ, गोरेगाव, मालाड, कुर्ला, मुलुंड, मीरा रोड, भाईंदर भागात मंगळवारी सकाळी पाऊस पडला. अंधेरी भागात 50 मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागात सोसाट्याचा वारा देखील सुटला होता.
#WATCH | Gusty winds and heavy rain lash Mumbai city in Maharashtra. Visuals from the Eastern Express Highway. pic.twitter.com/UruUTRs5yf
— ANI (@ANI) June 3, 2026
मध्य व दक्षिण मुंबईत ढगाळ वातावरण
मुंबई उपनगरात पावसाने हजेरी लावलेली असताना मध्य व दक्षिण मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा अद्याप संपलेली नाही. मध्य व दक्षिण मुंबईत मंगळवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी पावसाने शिडकाव केला.
वेस्टर्न एक्सप्रेसवर अपघात
उपनगरात पडलेल्या पावसानंतर गोरेगावजवळ पूलावर बस आणि चारचाकी गाडीचा अपघात झाला. तसेच पहिल्या पावासानंतर अनेक ठिकाणी बाईक घसरल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.






























































