डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते डिके शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पदाची व गोपनियतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

काँग्रेस हायकमांडने राज्यातील सर्व प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणांच्या आधारे नवीन टीमची निवड केली आहे. त्यात जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची तर कॅबिनेट मंत्री म्हणून यतींद्र, के.एच. मुनियप्पा, यु. टी. खादर, के.जे. जॉर्ज, कृष्णा गौडा, एम.बी. पाटील, पिऱयांक खर्गे, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी, दिनेश गुंडू राव, बायराथी सुरेश, ईश्वर खांद्रे हे मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.