नाशिक, मुंबईपाठोपाठ पुण्यातही ‘कॉर्पोरेट जिहाद’, हिंजवडीतील आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजी कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतरास नकार दिल्याने या महिलेला कामावरून काढण्यात आले असून, तिने याबाबत हिंजवडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. दरम्यान, नाशिकमधील टीसीएस कंपनी, मुंबईतील एसबीआय बँकेतील प्रकरणांसारखा हा ‘कॉर्पोरेट जिहाद’ असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

या पीडित महिलेने आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ‘आपबिती’ कथन केली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट, पराग गोखले, विवेक भोसले, गोपाल तेलंग, क्रांती पेंढकर उपस्थित होते.

पीडित हिंदू महिला म्हणाली, “कंपनीत कार्यरत असताना माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि एका मुस्लिम व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या प्रकाराला मी ठामपणे नकार देत कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने आरोपीवर कारवाई करण्याऐवजी मलाच नोकरीवरून काढून टाकले.”
मी कंपनीत प्रामाणिकपणे

आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव आपले कर्तव्य बजावत होते. मात्र, काही काळापूर्वी टीममधील शाहिना रफिक नावाच्या एका महिला सहकाऱ्याने वैयक्तिक आयुष्यात अवाजवी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. शाहिनाने तिच्या ओळखीच्या ‘शेख’ नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा, हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा खूप आग्रह धरला. “जर तू इस्लाम स्वीकारून मुस्लिम व्यक्तीसोबत राहिलीस, तर तुला दुबईत ऐषआरामात आणि शांततेत जीवन जगता येईल,” अशी प्रलोभने या महिलने मला दाखविल्याचे या महिलने सांगितले.

या छळाविरोधात विप्रो प्रशासनाला कायदेशीर नोटीस दिली आहे. दबावाखाली लिहून घेतलेला राजीनामा त्वरित रद्द करावा, पूर्ण वेतनासह आणि सेवासातत्यासह पुन्हा सन्मानाने नोकरीवर रुजू करून घ्यावे, अशी मागणी मी नोटिशीमध्ये केली आहे. याशिवाय, मानसिक त्रासापोटी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या नुकसानीपोटी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाईही दावा केली आहे. कंपनीने लेखी माफी मागावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही नोटिशीत म्हटले असल्याचे पीडित महिलने सांगितले. येत्या १५ दिवसांत कंपनीने यावर योग्य पावले न उचलल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही पीडितेने यावेळी दिला.

सुनील घनवट म्हणाले, या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करून दोघांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“विप्रो कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेने तिच्या सहकारी महिला कर्मचाऱ्याविरोधात मानसिक छळ केल्याचा अर्ज दिला आहे. अर्जामध्ये सहकारी महिलेने काही अयोग्य शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अनुषंगाने संबंधित महिला कर्मचाऱ्यास तसेच कंपनीतील वरिष्ठांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.” – बाळाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी