कृष्णा डोणगावकर व देवयानी डोणगावकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णा डोंणगावकर व देवयानी डोणगावकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर त्यांची आणि कृष्णा डोंणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.