ट्रेकिंगला गेलेली एमबीए विद्यार्थिनी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगदरम्यान एमबीए विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. बबिता पांडे असे बेपत्ता विद्यार्थिनीचे नाव असून, ती दोन मित्रांसह ट्रेकिंगसाठी गेले होती. पाच दिवस उलटले तरी बबिताचा अद्याप शोध लागला नाही. याप्रकरणी बबिताच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय एका ट्रेकिंग एजन्सीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बबिता ही नैनितालची रहिवासी असून, 28 मे रोजी ती दोन मित्रांसह रायथल गावात गेली होती.