
चेहरा काळवंडणे हे केवळ सूर्यप्रकाशामुळे नाही, तर त्यामागे मेलॅनिनचे असंतुलन, हार्मोनल बदल, इन्सुलिन रेझिस्टन्स, पोषक तत्त्वांची कमतरता ही कारणे असू शकतात.
याशिवाय चेहऱ्यावर काळे डाग किंवा अचानक येणारा काळपटपणा हा लिव्हर किंवा इन्सुलिनच्या प्रतिकाराशी संबंधित टाईप-2 मधुमेह किंवा पीसीओडी संकेत असू शकतो.
व्हिटॅमिन-2ची कमतरता आणि रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी चेहरा काळपट दिसू लागतो.
रक्तदाबाची औषधे, अँटीबायोटिक्स, काही वेदनाशामक गोळ्या किंवा जास्त केमिकल्स असलेले ब्युटी प्रोडक्ट्समुळे त्वचा प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर लगेच काळी पडते.
त्यामुळे योग्य आहार, सनस्क्रीनचा वापर आणि पुरेसे पाणी प्या. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारेल. मात्र समस्या कायम राहिल्यास वैद्यकीय तपासणी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


























































