दबावाच्या बाऊन्सरपासून वैभवला वाचवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने हिंदुस्थानी क्रिकेटच्या दारावर अशी धडक दिली आहे की, 36 वर्षांपासून सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रमही मोडला जाणार आहे. आयर्लंड, इंग्लंड दौरे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या टी-20 संघात निवड होताच वैभव चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र 1983 सालच्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी या गगनभरारीला संयमाची लगाम घातली. हा मुलगा असामान्य आहे, पण अजून पर्वत चढायचे आहेत. त्याच्यावर अपेक्षांचं ओझं टाकू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. राजस्थानकडून आयपीएलमध्ये 776 धावा, 72 षटकार, एक शतक आणि ऑरेंज टोपी जिंकणाऱ्या वैभवने गोलंदाजांचा धुव्वा उडवला. आता श्रीलंकेत हिंदुस्थानी अ संघाकडून तो पुढचा डंका वाजवण्यासाठी सज्ज आहे. हिंदुस्थानी क्रिकेटला नवा तारा सापडला आहे, फक्त त्याला अकाली सूर्य बनवण्याची घाई नको!