
पाकव्याप्त कश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष अद्याप सुरूच आहे. या आंदोलनात आतापर्यंत 46 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी 1100 आंदोलकांना अटक केली असून अटकसत्र सुरूच आहे.
27 जुलै रोजी पीओकेमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यातील 12 जागा या आरक्षित असून यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या जागा जम्मू-कश्मीरमधून पाकिस्तानच्या इतर भागांत स्थलांतरित निर्वासितांसाठी आरक्षित आहेत. परंतु, जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीने या जागा रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

























































