
रायगड पोलिसांनी अलिबाग तालुक्यातील सारळ येथील ‘इनर सर्कल सोसायटी’ या हायप्रोफाईल सोसायटीत अमली पदार्थांचे सेकन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांना पकडण्यात आले आहे.
सुनील चावला (69) व हरेंद्र सिंग (65) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेलाही ताब्यात घेतले आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी एन.डी.पी.एस आणि इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































