बाळ मानेंना भाजपात प्रवेश नाही, रवींद्र चव्हाणांचे रत्नागिरीत वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रायगड-रत्नागिरी-सिधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विश्वासघात करून उमेदवारी मागे घेणाऱ्या बाळ माने यांची शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाकालपट्टी झाल्यानंतर आता त्यांचे भाजप प्रवेशाचे वांदे झाले आहेत.मी प्रदेशाध्यक्ष असे पर्यंत भाजपमध्ये बाळ माने यांना भाजपमध्ये प्रवेश नाही असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज रत्नागिरीत जाहिर केल्यानंतर बाळ माने यांचे भाजप प्रवेशाचे मनसुबे उधळले आहेत.

भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीत आले होते.त्यावेळी त्यांनी बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत बाळ माने हा संपलेला विषय असल्याचे वक्तव्य केले आहे.