मिनी बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, जेजुरीला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरहून जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला मालाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील डी-मार्टसमोर रविवारी हा भीषण अपघात घडला. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सातारा हॉस्पिटल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळे गावचे रहिवासी आहेत. स्नेहल कांबळे (वय 16) आणि एकनाथ कांबळे (वय 75) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.