
अभ्यासाचा ताण असह्य झाल्याने जेईईची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वैदेही गुलगे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईईची तयारी करत होती.
वैदेहीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते, आई शिवणकाम करून दोन्ही मुलांचे शिक्षण करत होती. वैदेहीला क्लाससुद्धा लावला होता. ती अभ्यास करायची, परंतु परीक्षेत यश मिळेल की नाही या विचारातून ती तणावात असायची.

























































