
अमेरिकेत राहणाऱया एका हिंदुस्थानी महिलेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत दरवाजा दुरुस्त करण्यासाठी एका कार्पेंटरने तासाभराच्या कामाचे तब्बल दहा हजार रुपये घेतले. हा व्हिडीओ amrita_life_in_usa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता सिंग यांनी अमेरिकेत दरवाजा दुरुस्त करण्यासाठी एका कार्पेंटरला बोलावले होते. त्याने तासाभरात दरवाजा दुरुस्त केला. मात्र त्यासाठी त्याने 100 अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 9,500 रुपये मजुरी घेतली. या व्हिडीओमध्ये त्या म्हणतात, ‘अमेरिकेत कोणतेही काम लहान किंवा मोठे मानले जात नाही’.



























































