
विज्ञान शाखेप्रमाणे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील शाखांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती घेण्याची सूचना केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये याकरिता आलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच खासगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.



























































