
जगप्रसिद्ध टेनिसपटू नाओमी ओसाकाने 2026 च्या विम्बल्डन स्पर्धेतील तिच्या पहिल्याच सामन्यापूर्वी नाओमी ओसाकाने पांढरा किमोनो परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पोशाखावर जपानी संस्कृतीतील शांतता, सौंदर्य आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाणारे व्रेन (सारस पक्षी) आणि चेरी ब्लॉसम (सकुरा फुले) यांचं भरतकाम करण्यात आलं. हा व्हिडीओ ‘Wimbledon’ या युटय़ूब चॅनलवर बघायला मिळू शकतो. तिच्या या हटके लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात काwतुक झाले. अनेकांनी हा पोशाख जपानी परंपरेला दिलेली सुंदर मानवंदना तर काहींनी विम्बल्डनच्या परंपरा आणि आधुनिक फॅशन यांचा अप्रतिम संगम असल्याची प्रतिक्रिया दिली.




























































