तुकाराम मुंढेंनी दूध उत्पादकांकडे वळवला मोर्चा, भेसळमुक्त दूध जनतेला मिळावे यासाठी लागू केली नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा दूध व्यावसायिकांकडे वळवला आहे. तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत दूध उत्पादकांसाठी नवे नियम लागू केले आहे. मुंढे यांन दूध उत्पादकांसाठी नवी नियमावली सादर करत ‘सेव्ह फुड, सेव्ह ड्रग’ ही मोहिम हाती घेतली आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी, नवी नियमावली जारी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अंतर्गत दूध उत्पादकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यावर बोलताना मुंढे म्हणाले की, राज्यात ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग’ ही मोहीम आता आपण हाती घेतली आहे, आपल्या अन्नात सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे दूध. दूध उत्पादकांची बैठक मी घेतली होती, त्यांना प्रेझेंटेशन दाखवलं असून दूध प्रोडक्ट इकोसिस्टम असली पाहिजे. फार्म टू प्लेट प्रोसिजर आपल्याला बघावी लागेल, असे तुकाराम मुंढेंनी म्हटलं.

दूध संललन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आयस्क्रीम विक्रेते या सगळ्यांना हे नियम लागू असतील, असेही मुंढेंनी म्हटले.