
अमेरिकेत राहणाऱ्या एका हिंदुस्थानी इंजिनीअरने आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले असून 9 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अविनाश नार्ने असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर मृतदेहाचा फोटो हिंदुस्थानात राहणाऱ्या गर्लफ्रेंडला पाठवला होता.




























































