
असं म्हणतात प्राण्यांनाही प्रेमाची भाषा समजते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला गायींना दररोज खायला देते. एक दिवस तिला बाहेर जायचे असते, तेव्हा मुक्या प्राण्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून ती ‘झोमॅटो’द्वारे चपात्या मागवते आणि डिलिव्हरी बॉयला त्या प्राण्यांना खाऊ घालण्याची विनंती करते. डिलिव्हरी बॉय तिला विचारतो की, ही ऑर्डर त्या प्राण्यांसाठीच केली होती का? डिलिव्हरी बॉय महिलेच्या भूतदयेने प्रेरित होऊन स्वतःच्या खिशातून ऑर्डरचे पैसे भरतो. तो त्या गायींना प्रेमाने कुरवाळतानाही दिसतो. हा व्हिडीओ @themk09rider या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून ३० हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनीही महिला आणि डिलिव्हरी बॉयचे भरभरून कौतुक केले आहे.
































































