हे करून पहा – चपाती मऊ होण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीठ मळताना त्यात पाण्याचा वापर न करता कोमट दुधाचा वापर करा. तसेच चपात्या बनवण्यापूर्वी पिठात थोडे कोमट पाणी किंवा १ चमचा तेल घालून मळून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. चपात्या खूप मऊ होतात आणि जास्त वेळ ताज्या राहतात.

कणिक मळल्यानंतर ती लगेच लाटू नका. ती १५-२० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा, जेणेकरून पीठ छान मुरेल आणि चपात्या वातड होणार नाहीत. लाटताना कोरड्या पिठाचा वापर कमीत कमी करा.