
ताजा नारळ सहजपणे फोडण्यासाठी प्रथम त्याच्या वरच्या भागाला टोचून सर्व पाणी काढून टाका. त्यानंतर तो गॅस बर्नरवर ठेवून दोन ते तीन मिनिटे भाजा. यामुळे नारळाचा कठीण वरचा भाग सहजपणे फुटून वेगळा होईल.
नारळ 4-5 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्या. थंडीमुळे नारळाचे कवच आपुंचन पावते आणि त्यात भेगा पडतात. त्यानंतर हातोडा किंवा कोणत्याही जड वस्तूने हलकेच मारा, याने नारळ सहज फुटून बाहेर पडेल.





























































