Ratnagiri News – युवासेनेच्या मागणीनंतर एसटी बसच्या चालक-वाहकावर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाली- घाटिवळे बसच्या चालक आणि वाहकाने नाणीज बसस्टॉपवर पासधारक विद्यार्थीनीला दमदाटी करून बसमधून उतरवल्याचा प्रकार घडला होता. याबाबत युवासेनेने विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत एसटी प्रशासनाने संबंधित चालक आणि वाहक यांच्यावर खातेनिहाय कारवाई केली आहे तसेच प्रवाशांसोबत सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला आहे.

११ जुलै रोजी एका पासधारक विद्यार्थ्यींनीला बसमधून खाली उतरवल्याची घटना घडली होती. युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने या गंभीर प्रकाराची तक्रार करताना संबंधित चालक आणि वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.