पेटीएम पेमेंट्स बँक अखेर बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेटीएमला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता या बँकेचा पूर्णपणे गाशा गुंडाळण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. आरबीआयने यासंदर्भात आज माहिती दिली. उच्च न्यायालयाने एसआयआयचे माजी मुख्य सरव्यवस्थापक गिरीकुमार एम. नायर यांना पेटीएम पेमेंट्स बँकेचे अधिकृत लिक्विडेटर नियुक्त केले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना एप्रिल 2026 रोजी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर बँक पूर्णपणे बंद करण्यासाठी आरबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.