ब्रॉड पीकवर हिमस्खलनात बेपत्ता झालेले प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात निम्स दाई किंवा निम्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील ब्रॉड पीकवर चढाई करत असताना हिमस्खलनात ते बेपत्ता झाले होते. त्यांच्यासह अन्य आठ बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम तीव्र करण्यात आली होती. शनिवारी निर्मल पुर्जा यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. पुर्जा यांच्या ‘एलिट एक्सपेड’ या कंपनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

निर्मल पुर्जा यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांचा गट जगातील 12व्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर असलेल्या पीओकेतील ब्रॉड पीकवर गिर्यारोहणासाठी गेला होता. यादरम्यान गुरुवारी ब्रॉड पीकवर हिमस्खलनाचा तडाखा बसला. यात पुर्जा यांच्यासह 10 गिर्यारोहक बेपत्ता होते. शोधमेहिमेदरम्यान शुक्रवारी दोन गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले. अन्य बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध सुरू होता.