
मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी यादरम्यान नवीन दररोज धावणारी एक्स्प्रेस सेवा सुरू होणार आहे.
प्रस्तावित सेवेला 15087 सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी 15088 सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस असे क्रमांक देण्यात आले आहेत. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात येणार आहेत.




























































