असं झालं तर… बँकेत केवायसी अपडेट केली नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅंक किंवा इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये केवायसी (KYC) वेळत अपडेट न केल्यास खाते ब्लॉक होते, पैसे काढण्या-पाठवण्यावर मर्यादा आणि सरकारी योजनांचे लाभ बंद होतात.

भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांनुसार केवायसी करणे बंधनकारक आहे. यामुळे सरकारी योजनांचे पैसे किंवा पीएफ खाते तात्पुरते बंद किंवा निष्क्रीय होऊ शकते.

बँकेच्या मोबाईल अँप किंवा वेबसाइटवर लॉगिन करून आधार आणि पॅन कार्ड अपलोड करा. बँकेत जाऊन री-केवायसी फॉर्म भरा आणि ओळख व पत्त्याचा पुरावा जोडा.

एखाद्या वैयक्तिक निवासी ग्राहकाकडे आधार क्रमांक आणि मूळ पॅन कार्ड असल्यास तो व्हिडीओ कॉलद्वारे री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी तर मध्यम जोखमीच्या ग्राहकांना दर 8 वर्षांनी आणि कमी जोखमीच्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी करणं आवश्यक आहे.