रोहित पवार यांची तब्येत बिघडली, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. रोहित पवार यांनी सोशल मीडियावरूनही त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले आहे.

”गेले २-३ दिवस तब्येत साथ देत नाहीये. याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे. खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला, पण युवा पिढी शांत बसणारी नसते. तुमच्या सदिच्छाही पाठीशी आहेतच. त्यामुळं पुढील काही दिवस पती, मुलगा, वडील, भाऊ, जावई, मित्र या कौटुंबिक नात्यांसाठी जमेल तशी विश्रांती घेणार आहे पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांप्रती असलेलं कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडतच राहणार आहे. लवकरच पूर्णतः बरा होऊन नव्या ऊर्जेने असंच काम सुरु राहील”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.