
पालिकेच्या माटुंगा येथील एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर टेंडरच्या वादातून चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन जणांनी एकमेकांवर चाकूचे वार केले. या हल्ल्यात दोघे जखमी असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघेजण पालिकेच्या एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयात एका कामाच्या टेंडरसंदर्भात आले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. कार्यालयाबाहेर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि दोघांनीही सोबत आणलेले चाकू काढून एकमेकांवर हल्ला केला.



























































