
रेशन कार्ड हा सर्वसामान्य नागरिकांचं महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. पण तुमचं रेशन कार्ड हरवलं किंवा खराब झालं असेल तर आता चिंता नसावी. तुम्ही घरबसल्या ते डाऊनलोड करू शकता.
नवं रेशन कार्ड तयार करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही. आता घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करता येऊ शकते.
गुगल प्ले स्टोअरवरून Mera Ration App इंस्टॉल करा. तुमची भाषा निवडा. आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉगीन करा. आपल्या रेशन कार्डच्या सुरक्षेसाठी MPIN सेट करा.
लॉगीन केल्यानंतर रेशन कार्डची माहिती दिसेल. डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि पीडीएफ फाईल सेव्ह करा. त्यानंतर झेरॉक्स काढून तुम्हाला रेशन कार्ड उपलब्ध होईल.
DigiLocker अॅपच्या मदतीने रेशन कार्ड काढण्यासाठी प्रथम लॉगीन करा. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पर्याय निवडा. आधार क्रमांक टाकून `Get Document’वर क्लिक करा.































































