मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55, हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11. 10 ते दुपारी 4.40 पर्यंत, तर पश्चिम रेल्वेद्वारे हार्बर मार्गावरील गोरेगाव ते वांद्रे अप-डाऊनवर  सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.