
अमेरिकेमध्ये लवकरच मिडटर्म निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या विजयाची शक्यता अतिशय कमी असल्याचे समोर आले आहे.
इप्सॉस-एएपीआय या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ट्रम्प यांचा पक्ष पराभूत होण्याची शक्यता 65 टक्के एवढी आहे. तसे झाल्यास ट्रम्प यांना उर्वरित कार्यकाळादरम्यान त्यांना एकतर्फी निर्णय घेता येणार नाही. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात मिडटर्म निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यात होणारी ही सर्वात मोठी राजकीय परीक्षा आहे. यात अमेरिकेचे खासदार तसेच राज्य व इतर स्थानिक सरकारमधील महत्त्वपूर्ण पदांसाठी मतदान होते. पक्षाचा पराभव झाल्यास ट्रम्प यांना टॅरिफ, व्हिसा व इतर मोठे धोरणात्मक निर्णय एकतर्फी घेता येणार नाहीत.
ट्रम्प यांना झटका, अणू करारावरून माघारीची वेळ
ट्रम्प यांना युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा सल्ला त्यांच्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱयांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. आता ट्रम्प यांनी कळीच्या अणू करारावरून माघार घेतल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने होर्मुझमधून व्यावसायिक जहाजांना विनाअडथळा जाऊ दिल्यास अमेरिका युद्धातून माघार घेऊ शकते.
































































