विद्यार्थी चांगल्या शाळा व रस्ते मागत असताना मुख्यमंत्री… अभिजीत दीपके यांची सडकून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके हे शुक्रवारी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी गेले. घराकडे जात असताना त्यांनी ररस्त्याच्या दुतर्फा भाजपकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत एक पोस्ट लिहून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा रॅलीचे बॅनर्स लावलेले दिसत आहेत. त्यावर दीपके यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे. ”मी नुकताच माझ्या गावी आलो आहे, आणि जिथे पाहावे तिथे देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स दिसत आहेत. तिरंगा रॅलीचे स्वागतच आहे, पण खरंच सगळीकडे इतक्या मोठ्या बॅनर्सची गरज आहे का? हा पैसा ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे वापरता आला असता. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मागणी करत असताना, मुख्यमंत्र्यांनी मात्र संपूर्ण छत्रपती संभाजीनगर स्वतःच्या बॅनर्सने झाकून टाकले आहे”, अशी टीका दीपके यांनी केली आहे.